ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लहान मुलांना नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी आपण खूप पौष्टीक पदार्थ देत असतो.
पण रोजचे तेच पदार्थ मुलांसाठी कंटाळवाणे होतात. म्हणूनच आम्ही एक सोपी आणि पौष्टीक रेसिपी खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
तूर, मूग, चणा, मसूर या डाळी, चिरलेला कांदा, लसूण पाकळ्या, तेल, हिरवी मिरची, मीठ, हळद, जिरे, मोहरी, कोथिंबीर इ.
सर्वप्रथम सर्व डाळी रात्री भिजत घाला. मग दुसऱ्या दिवशी त्या मिक्सरमध्ये बारिक करून घ्या.
आता मिक्समध्ये हिरव्या मिरच्या, लसूण यांची पेस्ट तयार करून घ्या.
पुढे त्यामध्ये मीठ आणि हळद घालून मिश्रण नीट एकत्र करून घ्या.
नंतर सगळं मिश्रण एकत्र करून त्याचे गोळे करा आणि ते वाफवायला ठेवा.
आता कढईत तेल गरम करा त्यात जिरे मोहरी, लसूण आणि चिरलेला कांद्यांची फोडणी द्या.
आता वाफवलेले गोळे फुंडके घालून नीट परतून घ्या शेवटी त्यावर कोथिंबीर घालून गरमा गरम सर्व्ह करा.