Siddhi Hande
रोज काळी नाश्त्याला काय बनवावा हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडलेला असतो.
तुम्ही घरी मुलांसाठी पौष्टिक नाश्ता अवघ्या ५ मिनिटात बनवू शकतात. मुगाचा चिला बनवण्याची रेसिपी खूपच सोपी आहे.
मुगाचा चिला बनवण्यासाठी सर्वात आधी हिरवे मूग पाच तास भिजत ठेवा. त्यानंतर मूगाची जाडसर पेस्ट करा.
यानंतर डाळीच्या मिश्रणात हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट टाका.
या मिश्रणात आवश्यकतेनुसार मीठ, जिरे पावडर आणि लाल तिखट टाका.
या मिश्रणात थोड पाणी टाका. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करा.
यानंतर नॉन स्टिक पॅनवर तेल टाका. त्यावर हे मिश्रण छान पसरवून घ्या.
हा चिला दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्या. हा चिला तुम्ही हिरवी चटणी किंवा सॉससोबत खाऊ शकतात.
Next: घरच्या घरी गुजराती स्टाईल कुरकुरीत फाफडा कसा बनवायचा?