Manasvi Choudhary
जेवणासोबत तोंडी लावायला अनेकजण मिरचीची भजी बनवतात.
मिरचीची भजी खायला चविष्ट बनतात.
मिरचीची भजी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
मिरचीची भजी बनवण्यासाठी मिरची, बेसन, ओवा, हळद, मीठ, बेकिंग सोडा, बटाटे, चाट मसाला, लाल तिखट, जीरा पावडर हे साहित्य घ्या.
प्रथम सर्व मिरची स्वच्छ धुवून मधून चीर अश्या पद्धतीने कापून घ्या.
नंतर बेसन पीठ, ओवा, हळद, मीठ, पाणी, बेकिंग सोडा आणि पाणी हे सर्व एकत्रित करून घ्या.
स्टफ्फिंग साठी उकडलेले बटाटे कुस्करून घ्यावे. त्यात चाट मसाला, लाल तिखट, गरम मसाला, काळे मीठ,जीरे पावडर,धणे पावडर,आमचूर पावडर हे घाला.
आता हे मिश्रण मिरची मध्ये घाला. आणि मिरची बेसनाच्या मिश्रणात मिसळून घ्या.
गॅसवर कढईत गरम तेलामध्ये मिरच्या सोनेरी रंग येईपर्यत तळून घ्या.
अशाप्रकारे सर्व्हसाठी मिरचीची भजी तयार आहे.