Winter Methi Laddu Recipe: हिवाळ्यात खा मेथीचे लाडू, घरीच करण्यासाठी सोपी आहे रेसिपी

Manasvi Choudhary

शरीराला उष्णता

हिवाळ्यात शरीराला उष्णतेची गरज असते यासाठी डिंकाचे आणि मेथीचे लाडू खाल्ले जातात.

Winter Care Tips | Saam Tv

चवीला कडू

मेथीला चवीला कडू असली तरी आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Winter Methi Laddu Recipe | Saam Tv

साहित्य

मेथीच्या लाडू बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, तूप, गूळ, सुकं खोबरं, खारीक, वेलची, बदाम, काजू, हालिम, खसखस, रवा, डींक, मेथी दाणे हे साहित्य घ्या.

Winter Methi Laddu Recipe | Saam Tv

पदार्थ भाजून घ्या

गॅसवर कढईत मेथी दाणे, हलिम, सुखं खोबरे, खसखस, रवा हलके भाजून घ्या.

Winter Methi Laddu Recipe | Saam Tv

डिंक आणि तूप घाला

यानंतर तूपामध्ये डिंक परतून घ्या, गॅसवर कढईत तूप परत घालून त्यामध्ये गव्हाचे पीठ ब्राऊन रंग होईपर्यंत भाजून घ्या.

Winter Methi Laddu Recipe | Saam Tv

ड्रायफ्रुट्स घाला

मिक्सरमध्ये मेथी दाणे, वेलची वाटून एका परातीत गव्हाच्या पीठामध्ये मिक्स करून घ्या. यानंतर खारीक आणि ड्रायफ्रुट्स घालून सर्व मिश्रण एकजीव करा.

Winter Methi Laddu Recipe | Saam Tv

गुळाचा पाक करा

एका भांड्यात पाणी घ्या त्यामध्ये गूळ घाला अश्याप्रकारे गुळाचा पाक तयार होईल. यामध्ये तूप घालून मिश्रण चांगले ढवळून घ्या.

Winter Methi Laddu Recipe | Saam Tv

गोल आकारात वळून घ्या

मोठ्या भांड्यात हे सर्व मिश्रण एकजीव करून गोल आकार छान मेथीचे लाडू वळून घ्या.

Methi Ladoo | yandex

NEXT: Cracked Heels: वाढत्या थंडीत पायांच्या भेगा दुखतात? अशी घ्या काळजी

येथे क्लिक करा...