Manasvi Choudhary
केसांसाठी अनेक घरगुती उपाय केले जाता. मेथीचे दाणे केसांसाठी फायदेशीर आहेत. केस गळती, केस तुटणे, केस पांढरे होणे या समस्यांवर उपाय म्हणून तुम्ही मेथीच्या दाण्याचे तेल लावा.
मेथीच्या दाण्याचे तेल बनवण्यासाठी मेथी दाणे, नारळाचे तेल, कोरफड, काळे तीळ, कडीपत्ता, कडूनिंब पाने, तुळशीची पाने, जास्वंदी फुले, लवंग आणि कांदा हे साहित्य एकत्र करा.
सर्वातआधी मेथी भिजत घालून कापडामध्ये बांधून तिला मोड आणा, मोड आलेली मेथी उन्हात वाळवून त्याची पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये काळे तीळ मिक्स करा.
गॅसवर एका भांड्यामध्ये नारळाचे तेल, मेथी, काळ्या तीळांची पावडर आणि कांदा हे गरम करा.
त्यानंतर त्यात कढीपत्ता आणि कडूनिंबाची पाने मिक्स करा. मिश्रणात जास्वंदीची फुले आणि कोरफड मिक्स करा आणि तेल उकळून द्या.
अशाप्रकारे तेल तयार झाल्यानंतर थंड होऊद्या आणि नंतर काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.