Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात कामातून घरी गेल्यावर खूप चिडचिड होते.
पावसात गरमा गरम खायलासुद्धा आवडतं. या समस्येवरचा उपाय म्हणजे मसूर डाळीची खिचडी.
तांदूळ, मसूर डाळ, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण, आलं, लाल तिखट, गरम मसाला, जिरे, हिंग, मीठ, तेल, कोथिंबीर.
तांदूळ आणि मसूर डाळ धुवून २० मिनिटे भिजवून ठेवा.
कुकरमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, हिंग, आणि ठेचलेलं लसूण-आल्याची फोडणी द्या.
पुढे त्यात कांदा आणि हिरवी मिरची घालून सोनेरी रंग येईपर्यंत परता.
आता टोमॅटो, हळद, तिखट, मीठ मिक्स करा. मग त्यात तांदूळ आणि डाळ घाला.
योग्य प्रमाणात पाणी घालून २ ते ३ शिट्या करून घ्या.
आता कुकर उघडून खिचडी मिक्स झाल्यावर गरम मसाला आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा.