Saam Tv
मसूर डाळ ही डोसा बनवण्यासाठी वापरली जाणारी सर्वांत सामान्य डाळ आहे. याने शरीराला आवश्यक फायबर, प्रथिने मिळतात.
पुढे आपण डोसा बनवण्यासाठी मसूरच्या डाळीचा वापर करून साउथ इंडियन नाश्ता तयार करू शकतो.
मेथीचे दाणे, २ कप मसूर डाळ, मीठ, तेल, १ कप तांदूळ इ.
मसूर डाळ, तांदूळ आणि मेथीचे दाणे धुवून ३ तास भिजत ठेवा.
मेथीचे दाणे आणि तांदूळ हे मिश्रण बारिक वाटून पेस्ट करा. मसूर डाळ वेगळी बारिक करा.
दोन्ही बॅटर एकत्र करून घट्ट पेस्ट बनवा.
मिश्रण रात्रभर आंबू द्या जेणेकरून ते चांगले फुलेल.
एक तवा गरम करा, त्यातले पीठ नीट ढवळून घ्या आणि गरम तव्यावर गोल आकारात पसरवा.
जेव्हा बेस तपकिरी आणि कुरकुरीत होईल तेव्हा डोसा गरमागरम सर्व्ह करा.