Manasvi Choudhary
मॅगी खायला सर्वानाच आवडते सायंकाळी नाश्त्याला तुम्ही मसालेदार मॅगी बनवू शकता.
मॅगी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरीच १० मिनिटांमध्ये मॅगीची रेसिपी बनवू शकता.
मॅगी बनवण्यासाठी मॅगी, मॅगी मसाला, कांदा, टोमॅटो , मटार, गाजर, सिमला मिरची, मसाला, हळद, गरम मसाला, तेल, जिरे, हिरवी मिरची, कोथिंबीर हे साहित्य एकत्र करा.
कढईत गरम तेलामध्ये जिरे, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्या.
आता त्यात मटार, गाजर आणि सिमला मिरची घालून २-३ मिनिटे परतून घ्या भाज्या चांगल्या मिक्स करा.
भाज्या परतल्यानंतर त्यात चिरलेला टोमॅटो आणि चवीनुसार थोडे मीठ टाका टोमॅटो मऊ झाला की त्यात हळद, लाल तिखट आणि गरम मसाला टाकून सर्व एकत्र करा.
या मिश्रणात पाणी मिक्स करा पाण्याला उकळ आली की त्यात मॅगीचे तुकडे करून मिक्स करा.
मॅगी शिजवण्यासाठी त्यावर झाकण ठेवा. साधारणपणे ५ ते ७ मिनिटांमध्ये मॅगी तयार होईल.