Saam Tv
घरात खाण्यासाठी काही चटपटीत खाऊ विकत आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरीच आणि कमी वेळात पुढील रेसिपी करू शकता.
तुम्ही बाजारात गेल्यावर चटपटीत आणि मसालेदार शेंगदाणेच विकत आणतच असाल.
आता त्याची गरज नाही. पुढे आम्ही तुम्हाला कुरकुरीत चटपटीत आणि मसालेदार शेंगदाण्यांची सोपी रेसिपी सांगणार आहोत.
शेंगदाणे, बेसन, तांदळाचे पीठ, तेल, लाल तिखट, हळद, ओवा, मीठ इ.
शेंगदाणे मंद आचेवर कुरकुरीत भाजून घ्या.
आता एका भांड्यात अर्धी वाटी पाणी, लाल तिखट, मीठ, हळद, पेसन हे साहित्य मिक्स करून घ्या.
संपुर्ण साहित्य मिक्स झाल्यावर त्यात भाजलेले शेंगदाणे घाला.
आता कढईत तेल तापवा. मगच त्यात मसाल्यात कोट केलेले शेंगदाणे घाला.
शेंगदाणे सतत तळा. रंग लाल होईपर्यंत शेंगदाणेही कुरकुरीत होतील.
अशा प्रकारे तुम्ही कमी वेळात चटपटीत शेंगदाणे खाऊ शकता.