Manasvi Choudhary
मार्केटमध्ये चिवड्याचे विविध प्रकार मिळतात. चटपटीत, कुरकुरीत चिवडा खायला सर्वांनाच आवडतात.
यासाठी आज आम्ही तुम्हाला कुरकुरीत मसूर डाळ चिवडा घरच्या घरी कसा बनवायचा ही रेसिपी सांगणार आहोत.
मसूर डाळ मिक्स चिवडा घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. मसूर डाळ चिवडा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बनवू शकता.
मसूर डाळ मिक्स चिवडा बनवण्यासाठी मसूर डाळ, कढीपत्ता, तेल, मोहरी, जिरे, हिंग, मसाला, मीठ हे साहित्य एकत्र करा. सर्वातआधी मसूर डाळ चिवडा बनवण्यासाठी मसूर डाळ स्वच्छ निवडून ती धुवून घ्या.
धुतलेली मसूर डाळ सुती कापडावर पसरवून व्यवस्थित सुकवून घ्या गॅसवर कढईमध्ये थोडेसे तेल घाला त्यामध्ये मसूर डाळ खरपूस होईल अशी भाजून ध्या.
एका प्लेटमध्ये ही डाळ काढा नंतर या कढईमध्ये कढीपत्ता, शेंगदाणे, मसाला आणि चवीनुसार मीठ याची फोडणी द्या.
एका मोठ्या कढईमध्ये तेलात हिंग आण हळद मिक्स करा त्या मसाला देखील घालू शकता. आता या संपूर्ण मिश्रणात तळलेली मसूर डाळ, कढीपत्ता याचे मिश्रण घाला. अशाप्रकारे घरच्या घरी मसूर डाळीचा कुरकुरीत चिवडा तयार होईल.