Sakshi Sunil Jadhav
सध्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये लोक गरमा गरम खाण्याचे बेत आखत असतात.
आज आपण पुऱ्यांसोबत खाण्यासाठी घरच्या घरी श्रीखंड बनवण्याची रेसिपी जाणून घेणार आहोत.
दही, पिकलेल्या आंब्याचा गर, वेलची पावडर, केशर, साखरेची पावडर, सुती कापड, चिरलेला पिस्ता इ.
सर्वप्रथम एका भांड्यावर कापड पसरवून त्यावर दही ओतून कापड घट्ट बांधा.
कापडावर जाड वस्तू ठेवा आणि दही कोरडे करून घ्या.
दह्यापासून बनवलेला चक्का एका भांड्यात काढा.
आता चक्क्यामध्ये आंब्याचा गर वेलची पावडर केशर आणि साखर पावडर घाला सर्व साहित्य फेटून घ्या.
तयार केलेला आंबा श्रीखंड सर्विंग बाऊलमध्ये काढा त्यावर पिस्ता पिस्ता घालून सजवा.
आंबा श्रीखंड दोन ते तीन तास फ्रीजमध्ये ठेवा आणि थंडगार झाल्यावर गरमागरम पुरी सोबत सर्व्ह करा.