Manasvi Choudhary
सणासुदीला किंवा कार्यक्रमाला तुम्ही खास गोड पदार्थ बनवतात.
आंबा नारळ वडी घरी करण्याची चविष्ट रेसिपी आहे.
आंबा नारळ वडी बनवण्यासाठी मोठ्या आंब्याचा रस, साखर, नारळ, साजूक तूप, मिल्क पावडर, दूध हे साहित्य घ्या.
प्रथम आंबे स्वच्छ धुवून त्याचा रस काढा आणि साखर घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
संपूर्ण मिश्रण एका पॅन मध्ये काढून त्यात नारळाची चव व दुधात मिक्स केलेली मिल्क पावडर घाला.
तयार मिश्रण गॅसवर एका भांड्यात परतून घ्या. मिश्रण घट्ट झाल्यानंतर त्यात पिठीसाखर घाला.
आता एका ताटा तेल लावा आणि त्यामध्ये हे सर्व मिश्रण पसरून घ्या.
नंतर या मिश्रणाच्या चौकोनी वड्या तयार करा.