Siddhi Hande
मुंबईचं स्ट्रीट स्टाईल चायनीज खायला सर्वांनाच आवडते. अनेकजण मंच्युरियन घरीदेखील बनवतात.
मंच्युरियन बनवता येते परंतु त्यासोबतच लाल तिखट चटणी बनवता येत नाही. त्यामुळे मंच्युरियनला चव लागत नाही.
तु्म्ही घरीच मुंबईची स्ट्रीट स्टाईल चायनीजची चटणी बनवू शकतात.
सर्वात आधी तुम्हाला सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. या मिरच्या कोमट पाण्यात अर्धा तास भिजवत ठेवा.
अर्ध्या तासानंतर या मिरच्या पाण्यातून काढून मिक्सरमध्ये बारीक करा. यामध्ये पाणी टाकू नका. गरज पडल्यास १ तमचाभर पाणी टाका.
यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात बारीक चिरलेले आलं-लसूण टाका.
आलं-लसूण सोनेरी झाल्यानंतर त्यात मिरचीची पेस्ट टाका. या मिरचीला पाणी सुटेपर्यंत सतत हलवत राहा.
मिरचीच्या पेस्टला तेल सुटल्यावर त्यात व्हाईट सॉस, व्हिनेगर आणि मीठ टाका.
या चटणीला घट्टपणा येण्यासाठी एका वाटीत पाणी घ्या. त्यात कॉर्नफ्लोअर टाकून मिक्स करा.
हे कॉर्नफ्लोअरची पाणी चटणीत टाकून मिनिटे शिजवून घ्या.
या चटणीवर तेल तरंगू लागल्यावर गॅस बंद करा. ही चटणी तुम्ही चायनीज भेळ किंवा मंच्युरियनसोबत खाऊ शकतात.