ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मिल्क केक ही एक लोकप्रिय पारंपारिक मिठाई आहे. जी प्रामुख्याने दूध, साखर आणि तूपापासून बनवली जाते.
१ लीटर फुल क्रिम दूध, १ \४ कप साखर, १ चमचा तूप आणि १\२ चमचा वेलची पावडर
दूधाला एका मोठ्या भांड्यात उकळून घ्या आणि सतत दूधाला ढवळत राहा जेणे करुन दूध खाली पडणार नाही.
दूध जाड होई पर्यंत उकळवा, त्यानंतर साखर आणि तूप दूधात टाकून नीट मिक्स करा.
मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा, जोपर्यंत पॅनच्या सर्व बाजूंना लागत नाही तोपर्यंत शिजवा.
वेलची पावडर घाला आणि मिश्रण एका ग्रीस केलेल्या ट्रेमध्ये ओता आणि ते सेट होऊ द्या.
मिल्क केक थंड झाल्यावर त्याचे चौकोनी तुकडे करा आणि सर्व्ह करा.
तुमचा स्वादिष्ट आणि मऊ मिल्क केक तयार आहे. हि रेसीपी तुम्ही घरी नक्कीच ट्राय करू शकता.