Manasvi Choudhary
आईस्क्रीम खायला लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडते.
घरी आईस्क्रीम बनवण्याची रेसिपी सोपी आहे.
आईस्क्रीम बनवण्यासाठी दूध, साखर,क्रीम, बर्फ आणि मीठ हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम गॅसवर एका भांड्यात दूध उकळून थंड करा.
नंतर एका ग्लासभर दुधामध्ये मिल्क पावडर घाला.
मिल्क पावडर हळू हळू घाला जेणेकरून त्याचे गोळे होणार नाहीत.
आता एका भांड्यात क्रीम घ्या.
नंतर यामध्ये मिल्क पावडर दूध घालून मिश्रण एकजीव करा.
नंतर हे सर्व मिश्रण एकजीव करून फ्रिजमध्ये ठेवा.
अशाप्रकारे घरीच मलाईदार आईस्क्रीम सर्व्हसाठी तयार झाली आहे.