Makhana Ladoo Recipe : गणरायाच्या नैवेद्यासाठी बनवा स्वादिष्ट आणि पौष्टिक मखाना लाडू

Sakshi Sunil Jadhav

मखाने भाजून घ्या

कढईत तूप घालून मखाने मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.

Makhana Ladoo Recipe

मखान्याची पावडर तयार करा

भाजलेले मखाने थंड करून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.

makhana ladoo

खोबरे आणि खसखस भाजा

त्याच कढईत सुके खोबरे व खसखस हलके सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.

makhana recipes

ड्रायफ्रूट्स मिसळा

बारीक चिरलेले काजू आणि बदाम भाजलेल्या खोबऱ्यात व खसखशीत मिसळा.

healthy makhana ladoo

गुळाचा पाक तयार करा

कढईत तूप गरम करून त्यात गूळ घाला आणि मंद आचेवर व्यवस्थित वितळू द्या.

healthy makhana ladoo

सर्व साहित्य एकत्र करा

वितळलेल्या गुळात मखान्याची पावडर, खोबरे, खसखस आणि ड्रायफ्रूट्स घालून मिश्रण एकजीव करा. मिश्रणात वेलची पूड आणि चिमूटभर जायफळ पूड घालून चांगले परतून घ्या.

Ganesh Chaturthi recipes

मिश्रण मऊ करा

मिश्रण कोरडे वाटल्यास २ ते ३ चमचे कोमट दूध घालून लाडू वळण्याइतपत घट्ट करून घ्या.

Ganesh Chaturthi recipes

लाडू वळून नैवेद्य दाखवा

मिश्रण कोमट असतानाच तुपाचा हात लावून छोटे लाडू वळा आणि थंड झाल्यावर बाप्पाला नैवेद्य अर्पण करा.

Ganesh Chaturthi recipes

NEXT : डायबिटीज नसतानाही वाढू शकते ब्लड शुगर! रोजच्या ‘या’ 7 सवयी ठरतात कारणीभूत

Blood Sugar | meta ai
येथे क्लिक करा