Manasvi Choudhary
कारले चवीला कडू असले तरी ते आरोग्यासाठी गुणकारी मानले जाते. मात्र, कारल्याचा कडूपणा पाहून अनेकदा लहान मुले आणि घरातील इतर मंडळी ते खाण्यास नकार देतात. अशा वेळी जर तुम्ही कारल्याची एक युनिक आणि वेगळी रेसिपी ट्राय केली, तर अगदी लहान मुलेही ते बोटं चाटत आवडीने खातील.
तुम्ही कधी कारल्याचा भरीत खाल्ला आहे का? घरीच केलेला कारल्याचा भरीत लहानमुलेही आवडीने खातील.
कारल्याचा भरीत बनवण्याची रेसिपी सोपी आहे. तु्म्ही घरीच सोप्या पद्धतीने अवघ्या काही वेळात कारल्याचा भरीत बनवू शकता.
सर्वात आधी कारले स्वच्छ धुवून उभ्या आकारात कापून घ्या आणि त्यातील सर्व बिया काढून टाका. नंतर एका भांड्यात स्वच्छ पाणी घेऊन त्यात कापलेले कारले १५ मिनिटांसाठी भिजत ठेवा
गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये मोहरी, हिंग आणि हळद याची फोडणी द्या.या फोडणीमध्ये बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर त्यात लसूण, हिरवी मिरची आणि कारल्याचे तुकडे मिक्स करा.
संपूर्ण मिश्रण एकत्र करून त्यात चवीनुसार थोडे मीठ मिसळा. कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर भाजीला छान वाफवून घ्या म्हणजे कारले चांगले शिजेल.
शेवटी, भाजी व्यवस्थित शिजल्यावर त्यात शेंगदाण्याचा कूट, आंबटपणासाठी चिंचेचा रस आणि तुमचा घरगुती तिखट मसाला मिक्स करा. सर्व मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. तुमचे गरमागरम आणि झणझणीत कारल्याचे भरीत खाण्यासाठी तयार आहे!