ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ओठांवर लिपस्टिक जास्त वेळ टिकत नाही अशी प्रत्येक तरुणीची तक्रार असते.
अनेकवेळा लिपस्टिक निघू नये म्हणून आपण काही खाणे पिणे टाळतो.
अशा वेळी काही टीप्स आहेत,ज्यांच्या मदतीने ओठांवर लिपस्टिक जास्त वेळ टिकेल.
लिपस्टिक लावण्यापूर्वी लिप प्राइमर लावावे.
लिपस्टिक कायम दोन कोटमध्ये लावावी,असे केल्यास लवकर लिपस्टिक निघत नाही.
लिपस्टिक लावल्यानंतर त्यावर सेंटिग पावडर लावल्यास लिपस्टिक जास्त काळ टिकते.
लिपस्टिक लावण्याअगोदर ओठांना खोबरेल तेल लावल्यास लिपस्टिक जास्त काळ टिकते.
ओठांना लिप बाम लावण्यानंतर लिपस्टिक लावल्यास लिपस्टिक लवकर निघत नाही.