Siddhi Hande
महाराष्ट्राची एक वेगळी खाद्यसंस्कृती आहे. यामध्ये अनेक पदार्थांचा समावेश होतो.
महाराष्ट्राची स्पेशल डीश म्हणजे लाल भोपळ्याचे घागरे. प्रत्येक घरात हा पदार्थ बनवला जातो.
घारगे बनवण्यासाठी लाल भोपळा, गूळ, गव्हाचे पीठ, वेलची पूड, जायफळ पावडर, मीठ, तेल हे साहित्य लागते.
सर्वात आधी तुम्हाला भोपळ्याची साल काढून त्याचे तुकडे करायचे आहेत. यानंतर ते कुकरमध्ये उकडायचे आहेत.
यानंतर यात गूळ टाकायचा आहे. गूळ या मिश्रणात सहजपणे विरघळून जाईल.
यानंतर हे मिश्रण एका परातीत काढून घ्यायचे आहे. त्यात मीठ, वेलची आणि जायफळ पावडर मिक्स करा.
यानंतर या मिश्रणात आवश्यकतेनुसार गव्हाचे पीठ टाकून मिक्स करा. हे मिश्रण पाणी न वापरता मळून घ्या.
यानंतर मिश्रणाच्या लहान पुऱ्या हातावर थापून घ्या.या पुऱ्या तुम्ही कडकडीत तापलेल्या तेलात छान तळून घ्या.