Manasvi Choudhary
संध्याकाळी नाश्त्याला गरमा गरम कोथिंबीर भजी खाण्याची मज्जाच वेगळी असते.
घरच्या घरी कोथिंबीरची भजी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
कोथिंबीर भजी ही कोथिंबीर, बेसन, तांदळाचे पीठ, कांदा, तेल, हळद, हिंग, तिखट, जिरे पावडर, मीठ हे साहित्य वापरून बनवली जातात.
प्रथम कोथिंबीर स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्या.
एका भांड्यात कोथिंबीर, बेसन, तांदळाचे पीठ, कांदा, हिरव्या मिरच्या आले, लसूण, हिंग, ओवा, धनापावडर, जिरा पावडर, हळद, मसाला, मीठ आणि पाणी मिक्स करा.
पीठ जास्त घट्ट होणार नाही याची काळजी घ्या.
गॅसवर कढईत गरम तेलामध्ये तयार पिठाचे छोटे छोटे गोळे टाका. कोथिंबीरची भजी सोनेरी रंग होईपर्यत तळून घ्या.
अशाप्रकारे गरमा गरम भजी सर्व्हसाठी तयार आहेत.