Manasvi Choudhary
कुरकुरीत कांदा भजी खायला सर्वांनाच आवडतात.
कांदा भजी घरी करण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
कांदा भजी बनवण्यासाठी कांदे, हिरवी मिरची, तांदळाचे पीठ, बेसन पीठ, जिरे, ओवा, लाल तिखट, तेल, कोथिंबीर, मीठ हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम प्रथम कांदा उभ्या आकारात चिरून घ्या
हिरवी मिरची बारीक चिरून घ्या. नंतर यात मीठ घाला.
मिश्रणात ओवा, जिरे, लाल तिखट, तांदळाचे पीठ आणि बेसन पीठ घाला. नंतर कोथिंबीर घालून संपूर्ण मिश्रण मिक्स करून घ्या
गॅसवर गरम तेलामध्ये कांदा भजी छान तळून घ्या.