Manasvi Choudhary
फणसाची भाजी खायला सर्वांनाच आवडते.
फणसाची भाजी बनवण्याची रेसिपी अंत्यत सोपी आहे.
बाजारात सध्या फणसाला मोठी मागणी आहे.
फणसाची भाजी बनवण्यासाठी फणस, कांदा, टोमॅटो, ओला खोबरा, मोहरी, जिरे, हळद, हिंग, कढीपत्ता, तेल, मीठ आणि पाणी हे साहित्य घ्या.
पहिल्यांदा फणस सोलून त्याचे तुकडे करून घ्या.
गॅसवर एका भांड्यात फणसाचे तुकडे घालून पाणी घाला यामध्ये मीठ आणि हळद घाला.
मिक्सरच्या भांड्यात किसलेले खोबरे आणि हिरवी मिरची बारीक वाटून घ्या.
गॅसवर मध्यम आचेवर गरम तेलामध्ये मोहरी आणि जिरे घाला. यानंतर बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यत परतून घ्या.
मिश्रणात फणस आणि टोमॅटो घालून मिक्सरला बारीक केलेली पेस्ट घालून मिक्स करा.
मिश्रणात हळद, हिंग आणि चवीनुसार मीठ घालून संपूर्ण मिश्रण एकदा ढवळून घ्या.
अशाप्रकारे फणसाची मसालेदार भाजी सर्व्हसाठी तयार आहे.