Sakshi Sunil Jadhav
मऊ लुसलुशीत चपात्या हव्यात? त्याही कमी वेळात? मग पुढील स्टेप्स नक्की फॉलो करा.
हात न वापरता फक्त २ मिनिटांत कणीक मळायची सोपी आणि स्वच्छ पद्धत पुढे दिली आहे.
गव्हाचे पीठ २ कप, गरम पाणी तीन कप, १ चमचा तेल, मीठ इ.
मिक्सरच्या जारमध्ये २ कप कणीक, तेल, मीठ आणि १ कप गरम पाणी घालावे.
मिक्सर चालू करुन सर्व साहित्य मिक्स करून घ्या. त्यात गरजेनुसार पाणी ओता.
कणीक थोडी एकत्र झाली की, जार बंद करून स्पॅटुलाने थोडी कणीक बाजूला करून पुन्हा मिक्सर चालू करा.
कणीक सॉफ्ट आणि मळलेल्या टेक्सचरमध्ये आली की वाटीत काढून झाकून ठेवा.
झाकून ठेवताना तेलाचा हात लावून जरा मऊसर करून घ्या.
तव्यावर चपातीवर दोन बाजूंनी बारीक तेल लावल्यास ती लवकर सुकत नाही.