Manasvi Choudhary
गाय किंवा म्हैसच्या दुधाचा खरवस खायला सर्वांनाच आवडतो.
गाय किंवा म्हैस गरोदर असतना प्रसूतीच्या वेळी निघणाऱ्या दुधापासून घरगुती खरवस बनवला जातो.
घरीच गायीच्या दुधाचा खरवस बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
खरवस बनवण्यासाठी गाईचे दूध, वेलची, साखर,गूळ, जायफळ, सुंट हे साहित्य घ्या.
एका भांड्यात दूध घ्या नंतर यामध्ये किसलेले गूळ आणि वेलची, जायफळ पावडर घाला.
कुकरच्या भांड्यात हे सर्व मिश्रण एकत्रितरित्या करा. नंतर कुकरमध्ये तळाला थोडे पाणी घाला त्यानंतर हे मिश्रणाचे भांडे ठेवा.
नंतर कुकरला हे चांगले झाकण लावून वाफवून घ्या अशाप्रकारे खाण्यासाठी खरवस तयार आहे.