Bhajyanchi Amti Recipe: खान्देशी स्टाईल झणझणीत भज्यांची आमटी कशी बनवायची? पाहा ही सोपी रेसिपी

Manasvi Choudhary

खान्देशी पदार्थ

महाराष्ट्रातील प्रत्येक भागात वेगवेगळे पदार्थ बनवले जातात त्याची चव देखील वेगळीच असते. खान्देशी पदार्थाची चव म्हणजे तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही.

Traditional Sev Bhaji | instagram

चमचमीत पदार्थ

चमचमीत शेवभाजी, वरण बट्टी, भज्यांची आमटी हे खान्देशी प्रसिद्ध पदार्थ आहेत. आज आपण खान्देशी मसाल्यातली भज्यांची आमटी कशी बनवायची ही रेसिपी पाहणार आहोत.

Shev Bhaji Recipe

वाटण तयार करा

भज्यांची आमटी वाटण लागते ते बनवण्यासाठी कांदा, सुका खोबरा, हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर हे साहित्य घ्या.

Bhajyanchi Amti Recipe | SAAM TV

कांदा- खोबरा मिश्रण बनवा

सर्वातआधी कांदा उभ्या आकारात कापून घ्या नंतर गॅसवर कढईमध्ये भाजून घ्या. कांदा खरपूस भाजल्यानंतर त्यात किसलेला खोबरा मिक्स करा आणि दोन्ही मिश्रण परतून घ्या.

Onion | yandex

वाटण बारीक करा

भाजलेले मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून बारीक वाटून घ्या.

Mixer Grinder | Social Media

आमटी बनवून घ्या

आमटी बनवण्यासाठी तेलामध्ये बाजरी पिठ मिक्स करा. बाजरी पीठ टाकल्याने मिश्रण घट्ट होते. नंतर या मिश्रणात वाटण मिक्स करा मसाले, हळद, लाल मिरची ,धना पावडर, हळद हे मासेल मिक्स करा.

khandeeshi style Bhajyanchi Amti Recipe

आमटीच्या ग्रेव्हीत मसाले घाला

मिश्रणात गरम पाणी मिक्स करून चवीनुसार मीठ घाला अशाप्रकारे तुमची ग्रेव्ही तयार होईल.भजी तयार करण्यासाठी बेसन, पीठ. हळद, मिरची, आलं, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, जिरे आणि मीठ मिक्स करा.

khandeeshi style Bhajyanchi Amti Recipe

भज्यांची झणझणीत आमटी तयार

नंतर गॅसवर भजी बनवण्यासाठी कढईमध्ये तेलात पिठाचे बारीक बारीक गोळे करा आणि चांगले खरपूस फ्राय करून घ्या भजी तयार झाल्यानंतर भज्याची आमटी तुम्ही राईस, ज्वारी किंवा तांदळाच्या भाकरी सोबत सर्व्ह करू शकता.

khandeeshi style Bhajyanchi Amti Recipe

next: Kundali Matching Tips For Marriage: लग्नासाठी मुला- मुलीचे किती गुण जुळले पाहिजेत?

येथे क्लिक करा...