Manasvi Choudhary
खान्देशी प्रसिद्ध मसाला खिचडी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
खान्देशी मसाला खिचडी बनवण्यासाठी तांदूळ, तूरडाळ, तेल, कांदा, टोमॅटो, तेजपत्ता, दालचिनी, मसाला, हळद, जिरे, मोहरी, शेंगदाणे, मीठ हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम कुकरमध्ये गरम तेलामध्ये मोहरी घाला, कडीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घाला.
संपूर्ण मिश्रण छान परतून घ्या आणि त्यात तेजपत्ता आणि दालचिनी घाला.
मिश्रणात शेंगदाणे घालून मिश्रण चांगले परतून घ्या.
यानंतर मिश्रणात आलं - लसूण आणि मिरचीची पेस्ट घाला. नंतर यात हळद आणि थोडा मसाला घाला.
मिश्रणात बटाटे आणि टोमॅटो देखील आवडीनुसार घालू शकता.
नंतर या मिश्रणात तांदूळ धुवून घाला आणि त्यामध्ये तुरडाळ देखील घाला.
संपूर्ण मिश्रण चांगले ढवळून यामध्ये गरम पाणी घाला. चवीनुसार मीठ घालून कुकरचे झाकण लावून चांगले शिजवून घ्या.
अशाप्रकारे खान्देशी स्टाईल मसाला खिचडी सर्व्हसाठी तयार आहे.