Katachi Amti Recipe: मकरसंक्रांतीला पुरणपोळीसोबत बनवा झणझणीत कटाची आमटी; लगेच नोट करा रेसिपी

Siddhi Hande

मकरसंक्रांत

मकरसंक्रांत म्हटल्यावर प्रत्येक मराठी घरात पुरणपोळी ही बनतेच. पुरणपोळी आणि कटाची आमटी हा जेवणाचा बेत बेस्ट असतो.

Katachi Amti Recipe

कटाची आमटी रेसिपी

पुरणपोळी तर आपण बनवतो. परंतु त्याचसोबत झणझणीत कटाची आमटी कशी बनवायची हे जाणून घ्या.

Katachi Amti Recipe

साहित्य

पुरणपोळीसाठी शिजवलेली २ कप डाळ, सुकं खोबरं, कांदा, जिरं, तेल, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, लाल-तिखट, हळद, गरम मसाला, धने-जिरं पावडर, कोथिंबीर

Katachi Amti Recipe

शिजवलेली डाळ

आपण पुरणपोळी बनवण्यासाठी जी डाळ शिजवतो ना त्यातलीच दोन कप बाजूला काढून ठेवा. याचसोबत डाळीचे उरलेले पाणी बाजूला काढून ठेवा.

Katachi Amti Recipe

वाटण

सर्वात आधी तर खोबऱ्याचं वाटण बनवून घ्या. यासाठी सुकं खोबरं आणि जिरे मस्त खरपूस भाजून घ्या. हे मिक्सरमध्ये वाटा. त्यात थोडं पाणी टाका.

Katachi Amti Recipe

फोडणी

यानंतर कढईत तेल घ्या. त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता टाकून फोडणी द्या.

Katachi Amti Recipe

मसाले

या फोडणीत हळद, तिखट, लाल तिखट, धने-जिरे पावडर, घरचा स्पेशल मसाला टाकून एक मिनिटभर परतवून घ्या.

Katachi Amti Recipe

कटाचे पाणी टाका

यानंतर यात वाटण टाका. ते मस्त मिक्स करुन घ्या. यानंतर पुरणपोळीची डाळ आणि त्याचे कटाचे पाणी घाला.

Katachi Amti Recipe

आमटी उकळून घ्या

यानंतर आमटीला छान उकळी येऊ द्या. आमटीला तर्री येऊन द्यायची असेल तर त्यात गरम पाणी टाका. थंड पाणी टाकू नका.

Katachi Amti Recipe

कोथिंबीर

यानंतर आमटीला छान उकळू द्या. आमटी उकळल्यानंतर कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.

Katachi Amti Recipe

Next: मकर संक्रांतीला बनवा सोप्या पध्दतीचे तीळाचे लाडू, वाचा रेसिपी

Tilache Laddoo | GOOGLE
येथे क्लिक करा