Manasvi Choudhary
अनेक जण कारले कडू असल्याने त्याची भाजी बनवत नाही. मात्र तुम्हाला माहितीये का? कारले हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
या सोप्या पद्धतीने कारल्याची भाजी बनवल्यास ती कडू लागणार नाही. कारले बाजारातून आणताना कोवळे आणावे.
कारल्याचा मागील व पुढील गोल देठ कापून त्याला मीठ चोळावे म्हणजे कारल्याचा कडू पणा कमी होतो.
सर्वात आधी कारल्याचा रस्सा भाजी बनवण्यासाठी कारल्याचा बारीक गोलाकार चकत्या करा.
गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा, लसूण, लाल मिरची पावडर, मसाला, हळद, धनापावडर आणि मीठ घाला.
कारल्याला मीठ लावले असल्याने भाजीमध्ये मीठ थोडे कमी घालावे. नंतर या मिश्रणात थोडेसे पाणी टाका आणि भाजीची चांगली उकळून द्या.
या भाजीमध्ये तुम्ही थोडासा गूळ देखील घालू शकता यामुळे भाजी कडू लागणार नाही.