Saam Tv
गुजराती खाद्यसंस्कृतीत खाखराला महत्त्वाचे स्थान आहे, आणि त्याचबरोबर गोड चव प्रिय असणाऱ्यांसाठी "जलेबी खाखरा" ही एक नवी आणि हटके डिश आहे.
गव्हाचे पीठ, हळद, तूप, मीठ, जिलेबी, साखर पावडर, वेलची पावडर,
एका भांड्यात गव्हाचे पीठ, हळद, मीठ, तूप आणि गरजेनुसार पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या. १० मिनिटं झाकून ठेवा.
जिलेबी मिक्सरमध्ये बारीक करून त्यात साखर व वेलदोडा पावडर मिसळा.
पीठाचे छोटे गोळे करून लाटून खाखरासारखे पातळ पोळीसारखे लाटून घ्या.
मधोमध जलेबी मिश्रण भरा आणि दोन्ही बाजू बंद करून पुन्हा हलकं लाटून घ्या.
गरम तव्यावर मंद आचेवर खाखरा कुरकुरीत होईपर्यंत भाजा. वरून थोडं तूप लावून सर्व्ह करा.
हा खाकरा गोड आणि कुरकुरीत असून नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या खाण्यासाठी योग्य आहे.