Manasvi Choudhary
होळीच्या सणाला गरमागरम आणि रसरशीत जिलेबी खाण्याची मजा काही वेगळीच असते.
मिठाईच्या दुकानात मिळणारी कुरकुरीत जिलेबी आता तुम्ही घरीही बनवू शकता.
जिलेबी बनवण्यासाठी मैदा, दही, तूप, ईनो, भगवा रंग, साखर, वेलची पावडर, केशर, लिंबाचा रस साहित्य घ्या.
गॅसवर एका भांड्यामध्ये साखर आणि पाणी एकत्र गरम करा साखर विरघळली की त्या वेलची पावडर आणि केशर मिक्स करा.
आता हे मिश्रण गॅसवर चांगले शिजवून घ्या म्हणजेच त्याचा पाक तयार होईल. पाक तयार झाला की त्यात लिंबाचा रस टाकून गॅस बंद करा .
जिलेबीचे पीठ बनवण्यासाठी एका भांड्यात मैदा, दही, तूप आणि केशरी रंग मिक्स करा.
मिश्रणात थोडे पाणी मिक्स करा गुठळ्या होणार नाहीत असे मध्यम घट्ट पीठ भिजवा
नंतर या मिश्रणात ईनो टाका आणि त्यावर एक चमचा पाणी टाकून हलक्या हाताने मिक्स करा.
एका सॉसच्या बाटलीत किंवा दुधाच्या पिशवीत हे जिलेबीचे तयार पीठ भरा. त्यानंतर गॅसवर पसरट कढईत तेल किंवा तूप गरम करा.
आता यामध्ये जिलेबी गोलाकार आकारात सोडा आणि मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
तळलेली गरम जिलेबी लगेच कोमट पाकात टाका.फक्त ३०-४० सेकंद पाकात ठेवा आणि नंतर बाहेर काढा. जास्त वेळ ठेवल्यास जिलेबी मऊ पडू शकते.