Manasvi Choudhary
पावसाळ्यात गरमा गरम गुळाचा चहा आरोग्यासाठी गुणकारी मानला जातो.
गुळाच्या चहामध्ये तुम्ही वेलची, दालचिनी आणि काळीमिरी हे मसाले घातल्यास चहाची चव वाढते.
गुळाचा चहा वजन कमी करणे, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, सर्दी - खोकला यासाठी फायदेशीर आहे.
गुळाचा चहा बनवण्याची पद्धत देखील अत्यंत सोपी आहे. सर्वप्रथम एका भांड्यात पाणी गरम करा.
नंतर यात चहा पावडर, आलं, काळी मिरी, दालचिनी, इलायची, गूळ हे घाला.
चहाचा रंग बदलून चहा घट्ट होईपर्यत चांगला उकळून घ्या. अशाप्रकारे तुमचा गुळाचा स्पेशल चहा तयार आहे.