Tanvi Pol
पहिल्यांदा हिरव्या मिरच्या, लसूण, आणि शेंगदाणे कोरडे भाजून घ्यावे.
भाजलेले साहित्य आणि मीठ एकत्र वाटून घ्या.
वाटलेल्या मिश्रणात कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून मिक्स करुन घ्यावे.
मग पनीरचे लहान तुकडे करा आणि थेच्यामध्ये कोट करुन घ्या.
कढईत तेल गरम करून पनीरचे तुकडे दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
गरमागरम पनीर ठेचा पुदिनाची चटणी आणि कांद्याच्या फोडीसोबत सर्व्ह करा.
तुम्ही पनीर ठेचा स्टार्टर म्हणून, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुख्य जेवणात स्वादिष्ट साईड डिश म्हणून चवीनं खाऊ शकता.