Manasvi Choudhary
हॉटेलसारखी झणझणीत तर्रीदार मिसळ घरी बनवण्याची रेसिपी सोपी आहे. तुम्ही देखील ही रेसिपी घरी नक्की ट्राय करू शकता.
घरीच मिसळ पाव बनवण्यासाठी मटकी, हळद, मीठ, कांदा, सुकं खोबरे, आले, लसूण, टोमॅटो, तेल, जिरे- मोहरी, कढीपत्ता, मीठ, तेल, हे साहित्य एकत्र करा
मिसळ पाव बनवण्यासाठी सर्वात पहिले मोड आलेली मटकी कुकरमध्ये हळद, मीठ टाकून शिजवून घ्या.
गॅसवर पॅनमध्ये गरम तेलामध्ये उभा चिरलेला कांदा परतून घ्या नंतर यात सुका खोबरा मिक्स करा. कांदा, खोबरा भाजून झाला की कोथिंबीर आणि लसूण याची बारीक पेस्ट करा.
गॅसवर कढईत गरम तेलामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्ता मिक्स करा नंतर या मिश्रणात तयार मिसळचे वाटण मिक्स करा आणि एकत्र परतून घ्या.
या मिश्रणात कांदा- लसूण मसाला, मिसळ मसाला मिक्स करा यामुळे रश्श्याला हॉटेलसारखी चव येते
तयार मिश्रणात चवीनुसार मीठ आणि थोडे पाणी टाकून मिसळ चांगली शिजवून घ्या.
मिसळ तयार झाल्यानंतर सर्व्हसाठी त्यावर फरसाण, कांदा, कोथिंबीर आणि लिंबूने सजवून घ्या.