Manasvi Choudhary
हॉटेलला डिनरला गेल्यानंतर आवडीने तुम्ही व्हेज मंच्युरियन राईस ऑर्डर करता. मात्र अनेकदा घरी हॉटेलसारखा मंच्युरियन राईस बनत नाही. यासाठी आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी व्हेज मंच्युरियन राईस कसा बनवायचा सांगणार आहे.
मंच्युरियन राईस घरच्या घरी देखील तुम्ही बनवू शकता. मंच्युरियन राईस बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
मंच्युरियन राईस बनवण्यासाठी कोबी, गाजर, मैदा, कॉर्नफ्लोर, मीठ, काळी मिरी, तेल , तांदूळ, कांदा पात, आलं लसूण, सिमला मिरची, व्हिनेगर, सोया सॉस, रेड चिली सॉस हे साहित्य एकत्र करा.
मंच्युरियन राईस बनवण्यासाठी सर्वात आधी तांदूळ शिजवून घ्या. तांदूळ मोकळा सुटसुटीत होण्यासाठी थंड करा.
यानंतर भाज्या कोबी , सिमला आणि गाजर हे बारीक चिरून घ्या. एका पातेल्यामध्ये किसलेल्या भाज्या मिक्स करा त्यात मैदा, कॉर्नफ्लोर, मीठ आणि काळी मिरी याचे मिश्रण एकत्र करा.
या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार करा आणि गॅसवर कढईत गरम तेलामध्ये हे गोळे सोनेरी रंग होईपर्यत तळून घ्या.
मंच्युरियन राईस बनवण्यासाठी कढईमध्ये थोडे तेल घाला त्यात आलं आणि लसूण याची पेस्ट मिस्क करा.
या मिश्रणात सिमला मिरची, सोया सॉस, रेड चिली सॉस घालून संपूर्ण मिश्रण परतून घ्या. नंतर यात भात मिक्स करा आणि अशाप्रकारे तुमचा मंच्युरियन राईस घरच्या घरी तयार होईल.