Siddhi Hande
रोज रोज घरी त्याच पालेभाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. तुम्ही घरी मस्त व्हेज कोल्हापूरी बनवू शकता.
व्हेज कोल्हापूरी बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी फ्लॉवर, वाटाणे, गाजर, शिमला मिरची, फ्रेंच बीन्स, मशरुम या भाज्या घुवून घ्यायच्या आहेत.
यानंतर फ्लॉवर, फ्रेंच बीन्स आणि वाटाणे शिजवून घ्या. शिमला मिरची आणि मथरुम वाफेवर शिजवा.
एका कढईत तेल टाका. त्यात जिरं, मोहरी आणि हिंग टाकून फोडणी द्या.
यानंतर हळद, लाल मिरची पावडर, धने पावडर, गरम मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून मिक्स करा.
यानंतर त्यात आलं-लसूण पेस्ट टाकून घ्या. एकीकडे कांदा आणि टॉमेटोची प्युरी बनवा ती मिक्स करा.
यात फेटलेले दही टाकून मिक्स करा. त्यात पाणी घालून मसाले छान मिक्स करा.
यानंतर या मसाल्यात सर्व भाज्या टाकून मिक्स करा. त्यावर मीठ टाका.
तुम्ही या भाजीत पनीरदेखील टाकू शकतात. यानंतर भाजीला छान उकळी येऊ द्या.
यानंतर भाजीवर कोथिंबीर टाकून मस्त गार्निश करा.
ही व्हेज कोल्हापूरी तुम्ही भाकर, चपाती किंवा रोटीसोबत खाऊ शकतात.