Tanvi Pol
कढईत तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा परतून घ्या आणि तो सोनेरी रंगाचा होईपर्यंत परता.
कढईतल्या कांद्यात आलं-लसूण पेस्ट घालून साधारण १ ते २ मिनिटे परता.
नंतर टोमॅटो टाकून नीट मऊ होईपर्यंत शिजवा.
आता हळद, तिखट, मालवणी मसाला आणि मीठ टाकून मसाला तेल सुटेपर्यंत परता.
नंतर एक कप पाणी घालून एक उकळी आणा.
शेव शेवटी घालावी. झाकण ठेवून २ते ३ मिनिटे वाफ काढा. शेव नरम होईपर्यंत थोडी शिजवावी.
वरून कोथिंबीर टाका आणि गरमागरम पोळी, भाकरी किंवा भाताबरोबर सर्व्ह करा.