Manasvi Choudhary
सोयाबीन चिली हा एक प्रसिद्ध पदार्थ आहे.
सोयाबीन चिली बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
सोयाबीन चिली बनवण्यासाठी सोयाबीन, सिमला मिरची, कांदा, कांद्याची पात, चिली सॉस, सोया व टोमॅटो सॉस, व्हिनेगर, कॉर्नफ्लॉअर, मैदा, लाल तिखट, आलं- लसूण पेस्ट, ग्रीन चिली सॉस , व्हिनेगर हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम सोयाबीन स्वच्छ धुवून पाच मिनिटे भिजत घाला.
नंतर सोयाबीन छान फुलल्यानंतर त्यातील पाणी काढू घ्या.
सोयाबीनमध्ये मीठ,तिखट,आलं लसूण पेस्ट आणि मिरपूड, सॉस घालून मिक्स करून घ्या.
सोयाबीनच्या मिश्रणाला कॉर्नफ्लॉवर व मैदामध्ये मिक्स करा.
गॅसवर गरम तेलामध्ये सोयाबीन एक एक करून लालसर होईपर्यत तळून घ्या.
गॅसवर दुसऱ्या बाजूला गरम तेलामध्ये हिरवी मिरची, आलं - लसूण पेस्ट परतून घ्या.
नंतर यामध्ये सॉस, लाल तिखट, मिरी पावडर घालून परतून घ्या चवीनुसार मीठ घाला.
तयार मिश्रणात वरतून कांद्याची पात किंवा कोथिंबीर घाला आणि सर्व्ह करा.