Saam Tv
बऱ्याच खाद्य प्रेमींना हॉटेलमधली मुग डाळ करी खायला प्रचंड आवडते.
तुम्हाला माहीतीये ही मुग डाळ करी तुम्ही कमी वेळात आणि घरच्या घरी तयार करू शकता. चला जाणून घेऊ रेसिपी.
मुग डाळ, कांदा, आलं, लसूण, जीरे, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर, हळद, मीठ, तेल किंवा घी, लाल मिरची इ.
मुग डाळ स्वच्छ धुवून आणि एका कुकरमध्ये घाला. त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी आणि हळद घाला व दोन ते शिट्टया काढून घ्या.
डाळ शिजली की, दुसरी कडे फोडणीसाठी तवा ठेवा.
सर्वप्रथम तेल आणि जीरे मोहरी घाला. मग त्यात कढीपत्ता आणि कोथिंबीर घाला.
आता त्यामध्ये कांदा, आलं-लसणाची पेस्ट आणि चिरलेला टोमॅटो घालून परता.
आता त्यामध्ये सर्व मसाले घाला आणि वरून कोथिंबीर घाला. दोन मिनिटांनी त्यामध्ये डाळ मिक्स करा.
डाळ अगोदरच व्यवस्थित शिजलीये का? हे तपासा. पुढे २ मिनिंटानी उकळी आल्यावर भातासोबत टेस्टी हॉटेलस्टाईल मुग डाळ करी सर्व्ह करा.