Manasvi Choudhary
लिंबू सरबत हे आरोग्यासाठी एक 'मॅजिक ड्रिंक' आहे. लिंबूमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात.
व्हिटॅमिन सी मुळे शरीराची आजारांशी लढण्याची शक्ती वाढते, ज्यामुळे सर्दी-खोकल्यासारख्या समस्या दूर राहतात.
लिंबू सरबत प्यायल्याने शरीरातील चयापचय वाढवते, ज्यामुळे चरबी जाळण्यास मदत होते व वजन कमी होते.
लिंबू सरबत बनवण्यासाठी लिंबू, पाणी, साखर, मीठ, काळे मीठ, जिरा पावडर, पुदीना हे साहित्य एकत्र करा.
एका मोठ्या भांड्यात पाणी घ्या त्यामध्ये साखर आणि मीठ मिक्स करा आणि ढवळून घ्या.
या मिश्रणात लिंबाचा रस पिळून घ्या. नंतर यात काळे मीठ आणि जिरा पावडर मिक्स करा.
सर्व मिश्रण एकदा व्यवस्थित ढवळून घ्या. ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे आणि पुदिन्याची पाने टाका अशाप्रकारे लिंबू सरबत तयार होईल.