Manasvi Choudhary
टोमॅटो चटणी खायला सर्वांनाच आवडते.
झटपट बनवणारी टोमॅटोची चटणी बनवायला अगदी सोपी आहे.
टोमॅटो चटणी बनवण्यासाठी मोठ्या आकाराचे टोमॅटो, लाल मिरची, लसूण, कोथिंबीर, हिंग, मीठ, तेल, मोहरी हे साहित्य घ्या.
टोमॅटो चटणी बनवण्यासाठी लाल मिरच्या, लसूण, कोथिंबीर या गोष्टी धुवून घ्या. गॅसवर कढईत गरम तेलात मोहरी घाला.
नंतर यामध्ये लसूण आणि लाल मिरची घालून परतून घ्या.
संपूर्ण मिश्रणात चिरलेले टोमॅटो आणि कोथिंबीर घाला.
यानंतर चवीनुसार मीठ आणि हिंग घालून मिश्रण एकजीव करा.
अशाप्रकारे गरमा गरम टोमॅटोची चटणी खाण्यासाठी तयार आहे.