Manasvi Choudhary
दिवाळीत गोड पदार्थ खाऊन तुम्हालाही कंटाळा आला असेल तर तुम्ही चटपटीत रेसिपी करा.
सोयाबीन चिली घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. सोयाबीन भाजीपेक्षा सोयाबीन चिली बनवणून खायला सर्वांना आवडते.
सोयाबीन चिली बनवण्यासाठी सोयाबीन, कांदा, हिरवी मिरची, गाजर, तेल, जिरे, अंडी, आलं- लसूण पेस्ट, कॉर्न फ्लोअर, मीठ, सोया सॉस, हिरवी मिरची, कोथिंबीर हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम सोयाबीन भिजवून घ्या आणि पाण्यात उकळून घ्या. नंतर कांदा, सिमला मिरची, हिरवी मिरची बारीक चिरून घ्या.
एका भांड्यात सोयाबीन पाण्याने पिळून घ्या नंतर त्यात अंडी, सोया सॉस, काळी मिरी, आले लसूण पेस्ट, मक्याचे पीठ, थोडे मीठ घालून मिक्स करा.
गॅसवर पॅनमध्ये गरम तेलामध्ये जिरे टाका नंतर त्यात कांदा, गाजर परतून घ्या नंतर त्यात सिमला मिरची आणि मीठ घाला.
संपूर्ण मिश्रणात सोया सॉस, टोमॅटो सॉस आणि व्हिनेगर घाला आणि झाकण लावा आता त्यात कोथिंबीर टाका अशाप्रकारे सोयाबीन चिली सर्व्हसाठी तयार आहे.