ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल लोक आरोग्याबाबत अधिक काळजी घेताना दिसून येतात आणि खाण्यापिण्यात सतत बदलकरित असतात. आता लोक गव्हाच्या ऐवजी मल्टीग्रेन पिठापासून बनवलेली चपाती खायला लागले आहेत.
मल्टीग्रेन पिठात गहू, सोया, मक्का , ज्वारी, बाजरी,नाचणी, ओट्स आणि हरभरा या सगळ्या धान्यांना दळून मल्टीग्रेन पिठ बनले जाते.
अनेक धान्यांच्या पिठापासून बनलेली चपाती बऱ्याचदा फाटते किंवा कडक बनते. तर जाणून घ्या मल्टीग्रेन पिठापासून मऊ चपाती कशी बनवावी?
कणिक मळण्याकरिता जास्त थंड किंवा गरम पाणी न घेता कोमट पाण्याचा वापर करावा.
हे पीठ लवकर ओले होत असल्याने मळायला घेतल्यावर कमी पाण्याने मळावे. यानंतर हळूहळू हातांना पाणी लावा आणि कणिक मळून घ्या.
पीठ मळून झाल्यावर, ते गुळगुळीत आणि मऊ करण्यासाठी कडक हातांनी दाब द्या.
पीठ मळून झाल्यावर, ५ मिनिटे पिठाला फुगण्यास ठेवून द्या आणि नंतर पिठ झाकून ठेवा.
आता पिठाचा गोळा बनवा, तो तुमच्या तळहातांमध्ये मळून घ्या आणि नंतर त्याला गोल आकार द्या.
हलक्या हातांनी चपाती लाटण्यास सुरुवात करा. जाडी किंवा पातळ जशी चपाती बनवता तशी बनवा. थोडे पीठ लावा आणि लाटून घ्या.
एक तवा गरम करा आणि नंतर आच कमी करा. चपाती तव्यावर ठेवा आणि दोन्ही बाजूंनी भाजूुन घ्या. यामुळे चपाती मऊ होईल.