Panchamrit : पंचामृत योग्यरित्या कसे बनवावे ? जाणून घ्या पद्धत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पंचामृत

पंचामृत हे पूजा आणि सणांमध्ये नैवैद्य म्हणून वापरले जाते. तसेच प्रसाद म्हणून पंचामृताचे सेवन केले जाते. पंचामृत हे पाच अमृतांपासून बनवलेले असते.

Panchamrit | GOOGLE

कसे बनवावे?

जर तुम्ही पंचामृत प्रसाद बनवण्याचा विचार करत असाल तर या सोप्या पध्दतीने तुम्ही स्वादिष्ट प्रसाद बनवू शकता.

Panchamrit | GOOGLE

साहित्य

दूध, दही, तूप, ड्राय फ्रुट्स, मखाना , तुळशीची पाने, पाणी, साखर आणि मध इ. साहित्य लागते.

Panchamrit | GOOGLE

दही फेटून घेणे

सर्वात आधी दही फेटून घ्या. दह्याला थोड पातळ करा जर दही जास्तच जाड असेल तर त्यात थोडे पाणी टाकून मिक्स करा.

Panchamrit | GOOGLE

दूध आणि तूप

दह्यातच तुम्हाला थोडे दूध आणि तूप मिक्स करायचे आहे. असे केल्यास दही पातळ होते आणि टेस्टसुद्धा चांगली लागते.

Panchamrit | GOOGLE

ड्राय फ्रुट्स बारिक करा

आता ड्राय फ्रुट्सचे छोटे तुकडे करुन घ्या. मखाना, काजू, बदाम, पिस्ता आणि मनुके याचे तुकडे करुन घ्या.

Panchamrit | GOOGLE

मिक्स करा

सगळ्या ड्राय फ्रुट्सला आता दह्यात टाकून चमच्याने चांगले मिक्स करुन घ्या.

Panchamrit | GOOGLE

साखर आणि मध

चवीनुसार साखर दह्यात मिक्स करा आणि २ चमचे मध टाका. याने चव चांगली लागते.

Panchamrit | GOOGLE

तुळशीची पाने

तुळशीची पाने स्वच्छ धुवून प्रसादामध्ये टाका. मग तुमचे पंचामृत बनवून तयार होईल.

Panchamrit | GOOGLE

Kothimbir Cream Soup : हिवाळ्यात बनवा गरमागरम कोथिंबीर क्रीम सूप, वाचा रेसिपी

Creamy Coriander Soup | GOOGLE
येथे क्लिक करा