Manasvi Choudhary
बऱ्याच महिला या केस वाढण्यासाठी अनेक उपाय करतात. बाजारातील महागड्या प्रोडक्टसचा वापर करतात.
मात्र तुम्हाला माहितीये का? घरगुती काही उपाय केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहेत.
उन्हाळ्यात केस गळणे, केस तुटणे या समस्या उद्भवतात अशावेळी देखील तुम्ही घरगुती सीरम लावू शकता.
घरीच सीरम बनवण्यासाठी तांदळाचे पाणी, ऑलिव्ह ऑइल, व्हिटॅमिन ई, लॅव्हेंडर तेल याचा वापर करा.
सर्वात पहिले एका भांड्यात रात्री तांदूळ भिजत घाला.
त्यानंतर तांदळाचे पाणी वेगळे करा आणि त्यात ऑलिव्ह ऑइल मिक्स करा.
दोन्ही एकत्र मिसळल्यानंतर त्यात व्हिटॅमिन इ तेल आणि लॅव्हेंडर तेल मिक्स करा.
सर्व साहित्य एकत्र मिक्स केल्यानंतर एका बाटलीमध्ये हे सीरम भरून ठेवा.
घरगुती सीरम तुम्ही दररोज किंवा एक दिवसानंतर लावू शकता यामुळे केसांची नैसर्गिकरित्या वाढ होईल.