Manasvi Choudhary
अंडा आरोग्यासाठी पौष्टिक मानला जातो. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण अंडी आवडीने खातात.
अशातच तुम्ही कधी अंडा पराठा रेसिपी ट्राय केलीये का. अंडा पराठा घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
अंडा पराठा बनवण्यासाठी दोन अंडी, मीरी पावडर, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, तेल, मीठ हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम एका भांड्यात अंड फोडून घ्या
त्यात मीरी पावडर, मीठ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घाला.
संपूर्ण मिश्रण चांगले फेटून घ्या. गॅसवर गरम तव्यावर हे मिश्रण टाका. नंतर यावर चपाती टाका आणि चपाती चांगली भाजून घ्या.
अशाप्रकारे हेल्दी अन् टेस्टी अंडा पराठा रेसिपी सर्व्हसाठी तयार आहे.