Manasvi Choudhary
जेवणाच्या ताटात पदार्थासोबत चटणी, ठेचा आणि लोणचे असल्याने चव आणखी येते.
महाराष्ट्रीयन कुटुंबात मिरचीचा ठेचा खायला सर्वांनाच आवडते.
हिरव्या मिरचीचा ठेचा घरी बनवण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे.
हिरव्या मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी तुम्हाला लसूण, हिरवी मिरची, मीठ, कोथिंबीर हे साहित्य घ्यावे लागणार आहे.
सर्वप्रथम मिरचीचे बारीक बारीक तुकडे करून घ्या.
गॅसवर तव्यावर या बारीक केलेल्या हिरव्या मिरच्या साधारण परतून घ्या.
नंतर यामध्ये तेल आणि लसूण घाला. लसूण आणि मिरच्या एकत्र परतून घेतल्यानंतर गॅस बंद करा.
एका प्लेटमध्ये हे संपूर्ण मिश्रण थंड करून घ्या. यामध्ये मीठ घाला.
संपूर्ण मिश्रण एकत्र करून खलबत्यात किंवा मिक्सरला बारीक वाटून घ्या.
अशाप्रकारे झणझणीत मिरचीचा ठेचा सर्व्हसाठी तयार आहे.