हिरव्या मुगापासून बनवा खमंग लाडू; घरच्या घरी सोपी रेसिपी

Manasvi Choudhary

हिरवे मूग

मूग हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. प्रथिनांनी समृद्ध आणि पचायला हलक्या हिरव्या मुगापासून अनेक पदार्थ बनवले जातात.

Green Moong | Canva

हिरव्या मुगाचे लाडू

हिरव्या मुगाचे लाडू तुम्ही कधी बनवले आहेत का? हिरव्या मुगाचे लाडू बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Green Moong Ladoo Recipe

साहित्य

हिरव्या मुगाचे लाडू बनवण्यासठी हिरवे मूग, साखर, पिठीसाखर, तूप, वेलची पावडर, ड्रायफ्रुट्स, जायफळ पावडर हे साहित्य घ्या.

Green Moong | Canva

मूग भाजून घ्या

लाडू बनवण्यासाठी सर्वातआधी हिरवे मूग स्वच्छ निवडून धुवून घ्या. त्यानंतर गॅसवर मूग मध्यम आचेवर चांगले भाजून घ्या.

Green Moong Ladoo Recipe

पेस्ट तयार करा

भाजलेले मूग एका प्लेटमध्ये थंड करा त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात मूगाची बारीक पेस्ट तयार करा.

Green Moong Ladoo Recipe

मिश्रण परतून घ्या

गॅसवर कढईमध्ये गरम तूपामध्ये मुगाचे मिश्रण परतून घ्या. पिठ चांगले खंमग परतून घ्या.

Green Moong Ladoo Recipe

मिश्रण थंड करा

पीठ चांगले भाजले की गॅस बंद करा आणि मिश्रण थंड करा.

Green Moong Ladoo Recipe

ड्रायफ्रूट्स मिक्स करा

पिठामध्ये पिठीसाखर, वेलची पावडर, जायफळ पावडर आणिड्रायफ्रूट्सचे काप घालून सर्व साहित्य एकत्र करा.

Dryfruits | Pintrest

लाडू वळवून घ्या

त्यानंतर या मिश्रणाचे छोटे-छोटे लाडू वळून घ्या.

Green Moong Ladoo Recipe

NEXT: पावसाळ्यात बनवा अळुच्या पानांची कुरकुरीत भाजी

येथे क्लिक करा..