Manasvi Choudhary
पावसाळ्यात अळुच्या भाजीला विशेष मागणी असते. अळुच्या पानांच्या भाजीचे विविध प्रकार बनवले जातात.
पावसाळ्यात अस्सल पारंपरिक चव चाखायची असेल तर अळूच्या पानांची कुरकुरीत भजी तुम्ही करू शकता.
अळुच्या पानांची भजी बनवण्यासाठी अळुची पाने, बेसन, तांदळाचे पीठ, चिंच-गूळ, आले- लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, जिरे, ओवा, धना- जिरे पावडर, हळद, हिंग, मसाला, मीठ, तेल हे साहित्य घ्या.
एका मोठ्या बाऊलमध्ये बेसन, तांदळाचे पीठ, आले-लसूण-मिरची पेस्ट, ओवा, जिरे, हळद, हिंग, धना-जिरे पावडर, लाल तिखट, तीळ, चिंच-गुळाचा कोळ आणि चवीनुसार मीठ हे मिश्रण एकत्र करा.
नंतर या मिश्रणात तांदळाचे पीठ आणि बेसन मिक्स करा. संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्या.
नंतर या मिश्रणात पाणी मिक्स करा. मिश्रण जास्त पातळ किंवा जास्त घट्ट होणार नाही याची काळजी घ्या.
नंतर या मिश्रणात अळूची पाने घोळवून घ्या. पानांना मिश्रण नीट लागेल असे मिक्स करा.
गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये पकोडे चांगले फ्राय करून घ्या. भजी दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगाची होईपर्यंत कुरकुरीत फ्राय करा.