Sakshi Sunil Jadhav
बीटाचा भात हा कोणत्याही चाइनीस राईसपेक्षा खायला टेस्टी लागतो.
शिजवलेला भात, बीटाचा किस, तेल, मोहरी, जिरं, कांदा, हिरवी मिरची, हळद, लाल तिखट, मीठ, कोथिंबीर.
सर्वप्रथम एका कढईत तेल गरम करून घ्या.
तेलात मोहरी, जिरं चांगले तडतडवून घ्या.
पुढे कांदा उभा कापून त्यात मिरची, बीट, हळद घालून फोडणी परतून घ्या.
५ मिनिटे संपुर्ण मिश्रण शिजवून घ्या.
शिजवलेला भात,मीठ घालून ३ मिनिटे छान भात परतून घ्या.
राईसवर आता कोथिंबीर सर्व्ह करून लगेचच सर्व्ह करा.