Saam Tv
बदाम हे शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जातात. त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते.
तुम्ही ही बदामाची चटणी घरच्या घरी आणि कमी वेळात तयार करू शकता. पुढे तुम्हाला सोपी रेसिपी दिली आहे.
कढीपत्ता, भिजत घातलेले बदाम, तेल, मिरची, मीठ, जीरे मोहरी, १ इंच आलं इ.
एका मिक्समध्ये आलं, बदाम, हिरवी मिरची, जीरे एकत्र करून वाटण करून घ्या.
चटणीमध्ये जास्त पाणी घालू नका. घट्टसर अशी पेस्ट तयार करा.
आता एका भांड्यात चटणी काढून घ्या. तसेच चटणीमध्ये चवीनुसार मीठ घाला.
आता दुसरीकडे फोडणीची तयारी करा. त्यामध्ये तेल, कढीपत्ता, जीरे-मोहरी, मिरची घालून घ्या.
फोडणी चांगली तडतडली की लगेचच तुमच्या चटणीमध्ये मिक्स करा.
चला तयार आहे तुमची स्वादिष्ठ चमचमीत चटणी ही तुम्ही इडली, डोसा, आंबोळ्या, पोहे अशा पदार्थांसोबत सर्व्ह करू शकता.